MAZEMAT

My Photo
Name:
Location: Pune, Maharashtra, India

Tuesday, May 26, 2009

Is this a way to express...

What should be the extent of faith? And it's replications? Sometime people cross ethical borders to express their deep faith. And even resort to kill anyone whom he/she even doesn't know properly. Recently, Panjab was on fire over one of the sects religious leader was attacked in Vienna, Austria. Actually world is a small village now. But, reacting to some incidents occurred in some another country means just madness. After shooting incident took place on Vienna, believers of that sects came on road with lethal weapons in order to attack public property. They torched vehicles and pelted stones. Police personal opened fire at some places to disperse unruly mob. Curfew was imposed to ease the tense situation. But, is this a way to express our anger over pity issue. Yes, I called it a pity issue as faith should not trigger violence in any form. We should not take our religion for granted. Religion is a medium to communicate with your God. But, when your unity, belief prompt you to do something violent for your religion, you simply diminish the worthiness of your feeling for your religion. Your religion, cast and sect never justify killing of any innocent mercilessly to express your anger or love.

Sunday, May 10, 2009

पुणे तेथे काय उणे

पुणे तेथे काय उणे असं म्हटलं जातं. यात खोटं ते काहीच नाही. काही दिवसांपूर्वी ऑटोरिक्षा चालकांचा बंद पुणेकरांनी अनुभवला. हा बंद तब्बल चार दिवस चालला. या वेळी रस्त्यांवर उन्हातान्हात बस किंवा ऑटोची वाट बघणाऱ्या सर्वसामान्य पुणेकरांचे मोठे हाल झाले. त्यांच्या मदतीला कोणीच धावून आलं नाही. पुणेकरांचे कैवारी असल्याचं ढोंग करणारं जिल्हा प्रशासन सुद्धा. त्यामुळे या सर्वसामान्य पुणेकर बांधवांची मदत करण्याची भूमिका इतर पुणेकरांनाच घ्यावी लागली. शेवटी एकदाचा बंद मिटला आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. ऑटो चालकांनीही आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. आता पहिल्या किलोमिटरसाठी प्रवाशांना एक रुपया जास्त द्यावा लागणार आहे. तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमिटरचा दर आठ रुपयांनी ठरविण्यात येणार आहे. या निर्णयाचा भूर्दड सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशाला बसणार आहे. पुण्यात काहीच उणं होत नाही, तर एकदा वाढ म्हटली की ती ठरलेलीच असते, याची प्रतिची यातून आली.
स्मार्ट ऑटो, सिएनजी किंवा एलपीजी सुविधा, रिक्षा भाडे आदी विषयांवरून पुण्याच्या ऑटोरिक्षा संघटना आणि जिल्हा प्रशासनात गेल्या काही दिवसांपासून कमालीचा संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं चर्चेचा घोडा काही पुढे सरकरत नसल्याचं दिसून येतं. यातच भर म्हणून की काय जिल्हा प्रशासनानं ऑटोच्या भाड्यात एक रुपयांनी घट करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑटो चालकांना कदापी मान्य होणार नाही, याची पुरेशी कल्पना प्रशासनाला होती. त्यामुळे पॅट्रोल, डिझेलच्या दरात घट झाल्यानं ऑटोचे दर कमी करण्याची सबब प्रशासनानं पुढं केली. तशी मागणीही काही दिवसांपासून करण्यात येत होती. तर पॅट्रोल, डिझेलच्या दराशी रिक्षा भाड्याला जोडू नये, अशी विनंती ऑटो चालकांनी केली होती. खरे पाहता, तेलाच्या किंमती वाढल्यावर भाड्यात वाढ करणाऱ्या ऑटो चालकांचे हे म्हणने पटण्यासारखे नाही. जिल्हा प्रशासनाच्या कुरघोडीला सडेतोड उत्तर देण्यासाठी ऑटो चालकांनी अखेर बंदाचे हत्यार उपसले. या वेळी ऑटो चालक पुणेकरांना वेठीस धरत असल्याचा कांगावा, प्रशासनानं केला. याचा परिणाम म्हणून ऑटो चालकांची प्रतीमा पुणेकरांच्या नजरेत डळमळीत झाली. तरिही चालकांनी बंद मागे घेतला नाही. आपल्या मागण्यांवर ते ठाम राहिले. चार दिवसांनी झालेल्या तडजोडीच्या बैठकीत त्यांनी बंद मागे घेतला पण रुपया वाढवूनच.

Thursday, May 07, 2009

काय म्हणताय आराम सुरू आहे!

एक पुणेकर ः
पुण्यातल्या अतिप्रतिष्ठित आणि प्रशस्त नगरीत म्हणजेच सदाशिवपेठेत राहणारे आबा तळहातावर चिमुटभर तंबाखू चोळत म्हणाले, आजकाल महागाई फारच वाढलीय. साधा तंबाखू खावा म्हटलं तरी हाताला घाम फुटतो आणि चुन्याचे पैशे वाचतात. असो पैसे वाचतात यांचंच काय ते समाधान. हल्ली महागाई ऐवढी वाढली आहे की बाजारात जावं भोपळा घ्यायला आणि करवंदांच्या आकाराचे बटाटे घेऊन परतावं. यांची भाजी केल्यावरही हीला विचारावं लागतं की भाजी कोणती आहे. आता या महागाईच्या विषयावरही इलेक्‍शन होऊ शकतं, हे कमालच आहे बुबा. म्हणे विकासावर इलेक्‍शन लढविणार. यांच्या बापानं तरी विकास पाहिला होता का? कसला करता पुण्याचा विकास, पार खड्डयातच टाकलेय पुण्याला. एकेकाळी सदाशिव पेठ म्हटली की अवघ्या पुण्याचे दर्शन व्हायचं. आता तर वीस किलोमिटरचा परिसर पालथा घातला तरी पुणं डोळ्यात मावत नाही. आता येवढ्या मोठ्या पुण्याचा विकास करणार, आणि तेही हे चिंधिचोर, राजकारणी. इलेक्‍शन आले की वाड्यांचे उंबरठे घासणारे हे.... यांना काय कळणार सदाशिवपेठी पुणेकरांच्या व्यथा. यांचं काम झालं की हे साधा ओळखीचा हातही वर करीत नाही, की खुशालीही विचारीत नाही. असं म्हणून आबानं तळहातावर उरलेल्या तंबाखूच्या काही काड्या झटकून राहिलेला तंबाखू जिभेखाली सरकवला. तंबाखू आत जाताच त्यांचा चेहरा समाधानाने फुलला. स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबारात नृत्याचा आनंद लुटत, दारूचा ग्लास तोंडाला लावत बसलेल्या दरबाऱ्यांसारखे आपल्या हात मोडलेल्या मोडक्‍या खूर्चीवर बसत आबा म्हणाले, अरे आपले तासगावचे आबा म्हणे वैशनौदेविला गेले आहे....पवारांना पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसलेले बघण्यासाठी साकडं घालणार आहे, म्हणे. आता आपले आबा तसे भोळेच म्हणा. त्यांना काय ठाऊक पंतप्रधानपदासाठी कोणकोणत्या देवि-देवतांना साकडे घालावे लागते, ते. ममता, असो की माया, म
ाया असो की जैललीता सर्वांना सारख्याचा ममतेनी माया लावावी लागते...आणि श्रद्धेने नैवद्य द्यावा लागतो. नाहीतर बाजपेयींसारखं व्हायचं. त्यांना काही जमलं नाही, या बायांना कसं नाचवावं ते, अनुभव कमी पडला. पण पवार मात्र करतील बरं का...असं म्हणताच बायकोची हाक कानावर पडली. तिला ओ देतच ते खूर्चीवरून उठले आणि स्वयंपाक घराकडे वळले. आता त्यांची फक्त वाकलेली पाठ.... आणि खाली आलेली मान दिसत होती....